मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकासंह कर्मचाèयांचा मूकमोर्चा

0
26

गोंदिया,दि.०७ःगोंदिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील १३० प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाèयांनी आपल्या विविध मागण्यासांठी आज गुरुवारला महाविद्यालय परिसरातून मुक मोर्चा काढून जिल्हाधिकाèयांना निवेदन सादर केले.त्या निवेदनात गेल्या ८ महिन्यापासून न मिळालेले वेतन,अप्रत्यक्षरित्या महाविद्यालय बंद करण्याकरीता सुरु असलेली प्रकिया तसेच कर्मचाèयांना इतर मिळणारे लाभ(महागाई भत्ता,नक्षलभत्ता)यासाठी हे आंदोलन करण्यात आले.आंदोलक प्राध्यापक व कर्मचारी यांनी या आंदोलनाची पुर्वसुचना संस्थेच्या सचिवांना लेखी स्वरुपात दिली होती.आज सकाळपासूनच सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी काळ्याफिती लावून आपल्या मागण्यासांठी महाविद्यालय परिसरात मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला.आंदोलनात प्रा.इंद्रकुमार जुनेजा,बी.एम.चौधरी,संजय रहागंडाले, जे.जी.लखवार, एल.बी.ठाकरे, ओ.एम.राय, डॉ.प्रकाश धोटे,जी.एस.कश्यप,के.के.नागपूरे,एस.एस.मखवाना,डी.बी.रायकवार,शिल्पा कृपाण,विजया रहागंडाले, एम.डी.राय, बी.डी.चव्हाण, व्ही.जी.बिसेन, ए.आर.शर्मा,डी.जी.महावाल,एम.बी.बनसोड,यु,एस.बडोले आदींचा समावेश होता.