34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ .अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने करणार लोकार्पण

.अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने करणार लोकार्पण

0
31

blank

गोेंदिया,दि.13 : येथील नवनिर्मित तहसील कार्यालयाला अद्यापही लोकार्पणाचा मुहूर्त सापडलेला नाही. त्यातच तहसील कार्यालयात वापरलेल्या साहित्य निकृष्ठ दर्जाचा आहे. त्याची चौकशी करण्यात यावी, तसेच १७ फेब्रुवारी पूर्वी या कार्यालयाचे लोकार्पण करण्यात यावे, अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने नवनिर्मित तहसील इमारतीचे लोकार्पण करणार अशा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांनी दिला आहे.
तहसील कार्यालयाची इमारत तयार होऊन वर्ष लोटत चालला त्यातच तहसील कार्यालयातील अंतर्गत साहित्यही लावण्यात आले आहे. हे साहित्य निकृष्ठ असल्याचे समोर आले असून त्या साहित्याची दुरुस्ती करून किंवा नव्याने साहित्य लावावे, अशी मागणी शिवसेनेने केली होती. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. इमारत तयार होऊन कामकाजासाठी सज्ज असली तरी लोकार्पणामुळे अद्यापही तहसील कार्यालय इंदिरागांधी संकूलातच आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. सद्या स्थितीत असलेल्या कार्यालयाकडे दुर्लक्ष होत असल्याने याचा लाभ अधिकारी, कर्मचारी घेत असून कुणीही वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांना कामा अभावी परत जावे लागत आहे. येत्या काही दिवसातच लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागणार आहे. त्या अनुषंगाने १७ फेब्रुवारीपर्यंत इमारतीचे लोकार्पण करावे, अन्यथा शिवसेना आपल्या परिने इमारतीचे लोकार्पण करेल, असा इशारा प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांनी दिला आहे.

blank