मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेआज विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन

0
34
वाशिम, दि. १४  : जिल्हात विविध योजने अंतर्गत झालेल्या विकास कामांचे लोकार्पण व तसेच नव्याने होणाऱ्या कामांच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवार, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी वाशिम येथे येत आहेत. नवीन नगरपरिषद प्रशासकीय इमारतीसमोरील टेम्पल गार्डन येथे दुपारी १ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुमारे २९१.४२ कोटी रुपयांच्या विविध कामांचे लोकार्पण होणार आहे. तसेच सुमारे ४३२.८१ कोटी रुपयांच्या नवीन कामांचे भूमिपूजन होणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज, 14 फेब्रुवारी 2019 रोजी वाशिम दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता सिंदखेडराजा येथून हेलिकॉप्टरने वाशिमकडे प्रयाण करतील. दुपारी 2.30 वाजता त्यांचे वाशिम पोलीस कवायत मैदानावरील हेलिपॅड येथे आगमन होईल. दुपारी 2.35 वाजता ते वाशिम नगरपरिषदकडे प्रयाण करतील. दुपारी 2.40 वाजता त्यांचे वाशिम नगरपरिषद येथे आगमन होईल. याठिकाणी ते नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी करतील. दुपारी 2.50 वाजता ते टेंपल गार्डनकडे प्रयाण करतील.
 दुपारी 2.55 वाजता मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे टेंपल गार्डन येथे आगमन होईल, याठिकाणी आयोजित वाशिम जिल्ह्यातील विविध योजनांतर्गत विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यास ते उपस्थित राहतील. सायंकाळी 4 वाजता ते वाशिम हेलिपॅडकडे प्रयाण करतील. सायंकाळी 4.05 वाजता त्यांचे पोलीस कवायत मैदानावरील हेलिपॅड येथे आगमन होईल. येथून ते हेलिकॉप्टरने अकोलाकडे प्रयाण करतील.

या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय राठोड, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, सह पालकमंत्री मदन येरावार, महाराष्ट्र शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, राज्य सल्लागार समितीचे (बालकांना मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकारी) उपाध्यक्ष आमदार श्रीकांत देशपांडे, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या कामांचे होणार लोकार्पण

  • वाशिम नगरपरिषद अंतर्गत कामे :-

१.      वाशिम नगरपरिषद कार्यालय प्रशासकीय इमारत (वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत – रु. १८ कोटी)

२.      वाशिम शहरातील भूमिगत गटार मलनिःसारण केंद्र (महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगोरोत्थान महाअभियान योजना- रु. ३४.८१ कोटी)

३.      वाशिम शहर रस्ते विकास प्रकल्प (महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगोरोत्थान महाअभियान अंतर्गत ७५० रस्त्यांचे बांधकाम – रु. ८१.५१ कोटी)

४.    वाशिम शहर वाढीव पाणीपुरवठा योजना (युआयडीएसएमटी योजनेंतर्गत- रु. ४८ कोटी)

५.     वाशिम शहरातील विविध रस्ते (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत – रु. १८ कोटी)

६.      मुख्याधिकारी व कर्मचारी निवासस्थान बांधकाम (जिल्हा वार्षिक योजना- रु. २ कोटी)

७.     १९२ दुकान गाळे बांधकाम (नगरपरिषद निधी अंतर्गत- रु. २० कोटी)

८.     वाशिम शहरातील विविध विकास कामे (जिल्हा वार्षिक योजना- रु. ११ कोटी)

  • सार्वजनिक बांधकाम विभाग, वाशिम अंतर्गत लोकार्पण होत असलेल्या इमारती –

१.      वाशिम येथे स्त्री रुग्णालय इमारत  –  रु. २०.४५ कोटी

२.      उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, वाशिम – रु. ८.३१ कोटी

३.      जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, वाशिम – रु. ४.७५ कोटी

४.    जिल्हा कोषागार कार्यालय, वाशिम – रु. १.४५ कोटी

५.     उपजिल्हा रुग्णालय, कारंजा लाड – रु. ८.०० कोटी

६.      पशुवैद्यकीय दवाखाना, कारंजा लाड – रु. २.९० कोटी

७.     प्रशासकीय इमारत, रिसोड – रु. ६.९० कोटी

८.     जी. एन. एम. नर्सिंग स्कूल, वाशिम – रु. ५.३४ कोटी

  • एकात्मिक ऊर्जा विकास योजना अंतर्गत ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्र, कोल्हटकरवाडी, ता. वाशिम

 

या कामांचे होणार भूमिपूजन

  • सार्वजनिक बांधकाम विभाग, वाशिम अंतर्गत भूमिपूजन सोहळा

१.      एचएएम एएम ९७ ए वाशिम जिल्हा मुख्यालयाला जोडणारा रस्ता सुधारणा (रा. मा. २९० कुपटा ते मंगरूळपीर कि.मी. १९.२६)

२.      एचएएम एएम ९७ बी वाशिम जिल्हा मुख्यालयाला जोडणारा रस्ता सुधारणा (रा. मा. २८७ कारंजा ते मानोरा कि. मी. ३५.२४)            –  रु. १४२.९६ कोटी

३.      एचएएम एएम ७७ वाशिम जिल्हा मुख्यालयाला रिठद जोडणारा वाशिम-रिसोड-लोणार रस्ता सुधारणा (रा. मा. ५१, कि. मी. ४५)     – रु. १२८. ९६ कोटी

४.    एचएएम एएम ७८ ए वाशिम जिल्हा मुख्यालयाला रिसोड (तालुका मुख्यालय) व लोणार सरोवराला जोडणारा वाशिम-रिसोड-लोणार रस्ता सुधारणा (रा. मा. ५१, कि.मी. १५)

५.     एचएएम एएम ७८ बी वाशिम जिल्ह्यातील शेलू-वाशिम रस्त्याची सुधारणा करणे (प्रजिमा १, कि.मी. ३२) – रु. ११७.८९ कोटी

६.      मानोरा नगरपंचायत प्रशासकीय इमारत बांधकाम   – रु. ३.०० कोटी

  • महावितरण कंपनीच्या वीज उपकेंद्रांचा भूमिपूजन सोहळा (अंदाजित किंमत – रु. ४० कोटी)

१.      कोकलगाव, ता. वाशिम येथे वीज उपकेंद्र

२.      गणेशपूर, ता. वाशिम येथे वीज उपकेंद्र

३.      उकळीपेन, ता. वाशिम येथे वीज उपकेंद्र

४.    ढिल्ली, ता. वाशिम येथे वीज उपकेंद्र

५.     वारा जहांगीर, ता. वाशिम येथे वीज उपकेंद्र

६.      मानोली, ता. मंगरूळपीर येथे वीज उपकेंद्र (HVDS)

७.     धोडप, ता. रिसोड येथे वीज उपकेंद्र (HVDS)

  • वाशिम जिल्ह्यातील १०० साठवण तलावांचे बांधकाम करणे