छत्रपती शिवाजी महाराज, संत रविदास यांना अभिवादन

0
29

वाशिम, दि. १९ :  छत्रपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महसूल तहसीलदार श्रीमती शीतल वाणी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, नायब तहसीलदार सुनील देशमुख, गिरीश जोशी, श्री. नागपुरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.