25.1 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home विदर्भ मूल-सिंदेवाही मार्गावर ट्रव्हल्स दुचाकीचा अपघात,दोघे ठार

मूल-सिंदेवाही मार्गावर ट्रव्हल्स दुचाकीचा अपघात,दोघे ठार

0
54

चंद्रपूर,दि.25: जिल्ह्यातील मूल-सिंदेवाही मार्गावर मरेगाव समोरील वळण मार्गावर सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास ट्रॅव्हल बस(MH-40 BG-6522) व दुचाकीचा (MH-40-BD-2407) भीषण अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.अंजनी ट्रॅव्हलची बस नागपूरकडे जात असताना विरुद्ध दिशेने येत असलेली दुचाकी बसवर जाऊन धडकली. यात प्रकाश धंदरे (३०), बाळू सिडाम (२८) हे दोघेही जागीच ठार झाले. त्यांच्यासोबत असलेला जंगली ससाही यात ठार झाला.