25.4 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home विदर्भ एसटी बस व दुचाकीच्या धडकेत पोलीस जवान जखमी

एसटी बस व दुचाकीच्या धडकेत पोलीस जवान जखमी

0
35

गडचिरोली,दि.25:  अहेरीहून-सिरोंचाकडे जाणारी बस (एमएच ४०-६०९४) व दुचाकीचा नागेपल्ली येथील शाळेसमोर आज सोमवारला सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली.
राज्य परिवहन महामंडळाची बस आलापल्ली मार्गाकडे जात असताना नागेपल्ली येथील राजे धर्मराव शाळेसमोर बस आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला.यात अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयातील पोलीस शिपाई विश्वनाथ सुरज बंशी रा. अहेरी हे जखमी झाले.घटनेच्या दरम्यान याच मार्गाने माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा वाहनांचा ताफा जात असताना अपघात झाल्याचे दिसताच धर्मरावबाबा यांनी लगेच गाडी थांबवून आपले वाहन उपलब्ध करून दिले आणि याच वाहनातून अहेरी उपजिल्हा रुग्णलयात जखमीस दाखल करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जखमीची पाहणी केली.