शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा-प्रफुल्ल पटेल यांची मागणी

0
8

साकोली : सर्वसामान्य माणसांच्या समस्या सोडविणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख आहे. जेव्हा केंद्रात व राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा स्वत:ला शेतकर्‍यांचे कैवारी म्हणणारे आता दिसेनासे झाले आहेत. यावर्षी गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. धानाला भाव नाही.त्यामुळे निसर्गासोबतच शासनही शेतकर्‍यांवर कोपला आहे.आता शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याची वेळ आली आहे. मोदी सरकारने शेतकर्‍यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल पटेल यांनी केली.
लहरीबाबा मठ देवस्थान साकोली येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, आ.राजेंद्र जैन, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, अविनाश ब्राम्हणकर, सदाशिव वलथरे, धनंजय दलाल, पद्माकर गहाणे, दामाजी खंडाईत, सुरेश कापगते, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, हेमकृष्ण वाडीभस्मे, डॉ.अनिल शेंडे, एन.सी. लोधीकर उपस्थित होते.
यावेळी सदाशिव वलथरे यांनी काही राजकारणी लोक खोटे बोलून, आमीष दाखवून राजकारण करतात. त्यामुळे अशा राजकारण्यांजवळ कार्यकर्ते जास्त काळ टिकून राहत नाही अशीच परिस्थिती विरोधी पक्षाची झाली आहे. राष्ट्रवादी पक्ष हा सर्वसामान्यांच्या भावना जाणणारा पक्ष आहे. कार्यकर्त्यांनी मनापासून काम करायला हवे, तरच पक्ष मजबूत होईल, असे सांगितले.
संचालन सुधन्वा चेटुले यांनी तर आभार प्रदर्शन अनिल टेंभरे यांनी केले. कार्यक्रमाला अंगराज समरीत, सुरेश बघेल, उर्मिला आगाशे, जया भुरे, रामचंद्र कोहळे, सुरेखा शहारे, डॉ.राजेश चंदवानी, अँड.अग्रवाल, शैलेश गजभिये, हेमंत भारद्वाज, ओम गायकवाड, रवी राऊत, मुशीर खान, राशीद कुरैशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक वासुदेव तितीरमारे व जिल्हा मच्छीमार संघाचे संचालक अमृत मोहनकर यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.