23.5 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ बेबी मडावी-महिला विकास साखळीत १२ हजार महिलांचा सहभाग

बेबी मडावी-महिला विकास साखळीत १२ हजार महिलांचा सहभाग

0
43
जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील इरणपार येथून २८ सप्टेंबर २०१८ रोजी २५ वर्षीय बेबी मडावी या आदिवासी तरुणीला राहत्या घरातून नक्षलवाद्यांनी बंदुकीचा धाक दाखवत नक्षल चळवळीत सहभागी होण्यासाठी धमकाले होते. मात्र, तिने नक्षल्यांच्या दबावासमोर न झुकता स्पष्ट नकार दिल्याने ६ ऑक्टोबर २०१८ ला तिची निर्घृण हत्या नक्षलवाद्यांनी केली होती. त्या घटनेचा निषेध आणि आदिवासी भागातील महिलांवर सातत्याने नक्षलवाद्यांकडून होत असलेल्या अत्याचाराच्या कृतीचा निषेध जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने करुन बेबी मडावीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आले.या कार्यक्रमासाठी तसेच आदिवासी महिलांच्या स्वप्नपूर्तीला बळ देण्यासाठी महिला विकास साखळीचे आयोजन करण्यात आले होते.या महिला साखळीमध्ये जिल्हाभरातील विविध शाळा- महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी तसेच हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. पोलीस विभागासह जिल्हाप्रशासन,स्थानिक स्वयंसेवी संस्था व शाळा महाविद्यालयानी आयोजनासाठी सहकार्य केले.
blank