मनसे जिल्हाध्यक्ष शिव शर्मा यांचा भाजप प्रवेश

0
20

मुख्यमंत्र्यांसमक्ष केला प्रवेश
गोंदिया, २५ मार्च : भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती व मनसेचे जिल्हाध्यक्ष शिव शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील वर्षा निवासस्थानी गोंदिया शहर भाजपचे शिष्टमंडळाने नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, नगरसेवक घनश्याम पानतावने, नगरसेवक जितेंद्र पंचबुद्धे, जिल्हा प्रचार प्रसिद्धी प्रमुख जयंत शुुक्ला, प्रदिपqसग ठाकूर यांचा समावेश होता. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष शिव शर्मा यांनी मुख्यमंत्र्यासमक्ष भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिव शर्मा यांनी, आपण पालकमंत्री राजकुमार बडोले, खा. नाना पटोले, जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, संघटन मंत्री आशिष वांदिले, माजी आ. हेमंत पटले, माजी आ. डॉ. खुशाल बोपचे, माजी आ. केशवराव मानकर, माजी आ. दयाराम कापगते, माजी आ. खोमेश रहांगडाले, माजी आ. भेरqसग नागपुरे, माजी आ. हरीश मोरे, डॉ. राधेश्याम अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेउन भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.