पळवाटा न शोधता नैतिकता जपून अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा-सविता पुराम

0
21

– जि. प. सर्वसाधारण सभा कारण न देता रद्द
गोंदिया- : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा २५ मार्च रोजी नियोजित होती. मात्र जि. प. अध्यक्षांनी २४ मार्च रोजी सायंकाळी सभा रद्द करण्याचे आदेश दिले. सभा रद्द करणे म्हणजे, पळवाटा शोधण्यासारखेच आहे. नियोजित सभा रद्द करण्यामागचे कुठलेही कारण न देता सभा रद्द करणे म्हणजे, भाजप सदस्यांच्या प्रश्नांना जि. प. अध्यक्ष विजय शिवणकर घाबरले असल्याचे सर्वार्थाने सिद्ध होते. भाजप जि. प. सदस्यांच्या मतांवर ते अध्यक्ष झाले होते. आता त्यांच्यात qहमत असेल तर नैतिकता जपून त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. जिल्हा परिषदेच्या अधिनियम ११६, १११ कलम ७ अंतर्गत सभा तहकूब करता येते. मात्र सभा रद्द करता येत नाही. सभा रद्द होण्याची सुचना अनेक जि. प. सदस्यांना मिळालेली नसल्याने ते २५ मार्च रोजी सभागृहात उपस्थित झाले होते. मात्र नियमबाह्य पद्धतीने सभा रद्द केल्यामुळे जि. प. प्रशासनाला यासंदर्भात कारणे विचारण्यात आली आहेत. तशी तक्रारही आयुक्तांना करण्यात आली आहे.