कलंकीत प्रत्येकी शिक्षक बडतर्फ,निलंबीत

0
30

गोंदिया-ः शिक्षकी पेशात राहून नियमबाह्य कामे करणाèया शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या शाळांची प्रतिमा धुळीत मिळविली. अशा शिक्षकांविरोधात जिल्हा परिषद प्रशासनाने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने देखील प्रशासनाची बाजू योग्य ठरवत चार शिक्षकांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांनी प्रत्येकी दोन शिक्षकांवर बडतर्फ आणि निलंबनाची कारवाई केली. तर निर्दोश दोघांचे निलंबन मागे घेण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षक लैंगीक छळाच्या प्रकरणांत अडकल्याच्या घटना वर्षागणीक वाढत चालल्या. त्यामुळे शिक्षण क्षेत्र कंलकीत झाले. जे शिक्षक इमानेइतबारे ज्ञानदानाचे काम करतात, त्यांच्यावर देखील काही शिक्षकांनी केलेल्या कृत्यांमुळे मान खाली करण्याची वेळ येते. जिल्ह्यातील चार शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रालाच नव्हे, अख्ख्या समाजाला मान खाली घालावी लागेल, असे कृत्य केले. त्यांच्याविरोधात पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे जिल्हा परिषद प्रशासन न्यायालयात गेले. आरोपींनी प्रकरण हातून निसटल्यानंर पुन्हा वरच्या न्यायालयात धाव घेतली. मात्र, गुन्हा शेवटी गुन्हाच ठरला. त्यांच्यावर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले. त्यामुळे त्या शिक्षकांवर कारवाई करण्यात आली. याउलट, जे शिक्षक निर्दोष असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले, त्यांना सेवेत सामावून घेण्याचा योग्य निर्णय न्यायालयाने दिला. निर्देश जिल्हा परिषदेला प्राप्त होताच त्या निर्णयाची अमलबजावणी जिल्हा परिषद प्रशासनाने केली. त्यानुसार काही वर्षांपूर्वी सालेकसा तालुक्यातील भजेपार येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक के. जी. बिसेन या शिक्षकाला अतिप्रसंगाच्या प्रकरणी न्यायालयाने बडतर्फ केले. त्याचसोबत तिरोडा तालुक्यातील करटी येथील केंद्रप्रमुख एन. डी. खापर्डे यांनी शासनाने पुरविलेल्या पुस्तकांची विक्री केली होती. या प्रकरणात दोषी आढळल्याने न्यायालयाने त्याला बडतर्फ करण्याचे आदेश बजावले. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सुरगाव शाळेचे शिक्षक टेकराम मारोती उके आणि त्यांच्या पत्नीमध्ये घरगुती विषयाला घेऊन भांडण होते. या प्रकरणात टेकराम उके दोषी आढळले. त्यांना निलंबीत करण्यात आले. तसेच गोरेगाव तालुक्यातील धुंदाटोला येथील मुख्याध्यापक केशवराव चौधरी याने शाळेतील विद्यार्थीनींचे लैंगीक शोषण केले. या प्रकरणात दोषी आढळल्याने त्याला निलंबीत करण्यात आले. शिक्षण क्षेत्राला कलंकीत करणाèया चौघांवर कारवाई झाली असताना न्यायालयाच्या आदेशानुसार चिचेवाडा येथील शिक्षीका आणि सालेकसा तालुक्यातील महाराजीटोला येथील यादोराव लांजेवार यांचे निलंबन मागे घेण्यात आले.