एकारा जंगलात वाघाच्या हल्यात 50 वर्षीय इसम ठार

0
20

ब्रम्हपुरी,दि.27 ;- तालुक्यातील रामपुरी (मेंडकी) येथील जानकीराम शंकर भलावी (वय 50) हे नेहमीप्रमाणे पत्नी अनुसयासोबत रामपुरीगावापासून 2 किलोमीटरवरील एकारा जंगलात मोहफुल गोळा करायला गेले असता आज सकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान दबा धरून बसलेल्या नरभक्षक वाघांने त्याच्यावर हल्ला जागीच ठार केल्याची घटना घडली.काहीवेळाने थोड्या अंतरावर असलेल्या पत्नीने हाक दिली असता प्रतिसाद न मिळाल्याने बोलण्याचा आवाज येत नाही म्हणून बघायाल गेली असता त्यांच्या चपला अस्त व्यस्त पडलेल्या दिसल्या आणि ओढत नेल्याचे खुणा दिसताच आरडाओरड केल्याने ईतर मोहफुल गोळा करणाऱ्या लोकांकडे धाव घेतली.त्यांच्या साहयाने शोध घेतला असता जानकीरामचा मृतदेह एकारा अंतर्गत अर्जुनी बिटात आढळून आला.
त्यामुळे रामपूरी एकारा व इतर परिसरात लोकांन मध्ये दहशत निर्माण झाली असून ,मोहफुल गोळा करून आपला उदर निर्वाह करणाऱ्या मजूर लोकांन वर याचा फार मोठा परिणाम झाला व यापुढे परिसरात सातत्याने नरभक्षक वाघाचे हल्ले होत असल्याने त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी किसान सभेचे नेते कॉ विनोद झोडगे यांनी केली आहे.रामपुरी येथील घटनेची माहिती मिळताच मेंडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार खेडीकर,वनविभागाचे गरमळे,सूर्यवंशी,राऊत यांनी भेट देत मृताच्या नातेवाईकाला वनविभागाच्यावतीने आर्थिक मदत देण्याचे मान्य केले.