बेरार टाईम्सचा दणका……अखेर सेनेच्या जिल्हाध्यक्षांचे छायाचित्र प्रचारसामग्रीवर

0
23

गोंदिया,दि.02 : राज्यातील लोकसभा निवडणूक व विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप-सेनेत युती झाली आहे.त्यानुसार लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुतीची पहिली प्रचार सभाही कोल्हापूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख झाली. भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष उमेदवाराच्या प्रचारसामग्रीवर शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांचे छायाचित्र नसल्याचे वृत्त बेरार टाईम्सने युती उमेदवाराच्या प्रचार सामग्रीतून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाद या मथळ्याखाली प्रकाशित केले होते.त्या प्रकाशित वृत्तानंतर भाजपमध्ये खळबळ माजली आणि लगेच सोशलमिडियासह प्रचार सामग्रीवर दोन्ही जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांचे छायाचित्र टाकण्यात आले.वृत्त प्रकाशितझाल्यानंतर भाजपच्यावतीने संबधित शिवेसना पदाधिकारी व प्रमुखांना आपले छायाचित्र पाठवा असा संदेशही देण्यात आला होता.त्यानंतर नागपूरचे आमदार डाॅ.परिणय फुके यांनी पुढाकार घेत गोंदिया जिल्हा शिवसेनाप्रमुख व त्यांच्यापदाधिकार्यांची जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्यासोबत सोमवारला बैठकही करुन दिल्याचे वृत्त समोर आले आहे.