शहरातील आरो यंत्राचे शुद्ध ठंड पाणी प्रवाशी , व्यापारी, नागरिकांना ठरले वरदान

0
16

गोरेगांव,दि.०५:- येथील नगर पंचायत द्वारे प्रवाशी, व्यापारी, शहरवासियांना स्वच्छ, शुद्ध ठंड पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील विविध भागात १२ आर ओ यंत्र बसविले आहेत. त्यामुळे शहरवासीयाबरोबर प्रवाशी, व्यापारी यांना तहान भागविण्यासाठी वरदान ठरत आहे तर दुसरीकडे या आर ओ च्या पाण्यामुळे पाणी प्याऊ, पाणी पाऊच,आर ओ कॅन ग्राहकांनी खरेदी करने बंद केले आहे. तर काही लोकांनी या पिण्याच्या वापर इतर घरगुती कामासाठी केल्याने गरजुंना पाण्यासाठी तात्कळत राहावे लागत आहे.
या आरो यंत्राकरीता नगरपंचायत ने प्लास्टीक पाणी टाकी लावली आहे या टाकीची क्षमता एक हजार लिटर पाणी ते एक हजार पाचशे लिटरची आहे.त्यामुळे वर्दळ असलेल्या ठिकाणी बस स्थानक, कूषी उत्पन बाजार समिती, दुर्गा चौक, गणेश मंदिर, जुने बस स्थानक , जिल्हा परिषद शाळा परीसर , राधा कृष्ण मंदिर, पी.डी. रंहागडाले शाळा परीसर , ठाणा रोड चौक, भंगाराम चौक, हलबीटोला व चंद्रपुरटोली अश्या सार्वजनिक ठिकाणी आर ओ यंत्र बसविले आहेत.या आरो यंत्राची देखरेख दुरुस्ती नियमित केली जात असुन महीण्यातुन एकदा पाणी टाकी साफ केली जाते त्यामुळे शुद्ध ठंड पाणी उपलब्ध होत आहे.
एकीकडे या आर ओ यंत्राच्या पाण्याचा सतपयोग होत आहे तर दुसरीकडे नगरवासीयाकडुन दुरुपयोग केला जातो अशी तक्रार दाखल केली गेली.या तक्रारीत काही नागरीक पाणी कॅन खरीदी करून या  कॅन व्दारे पाणी स्टॉक करीत आहेत व या पाण्याचा वापर आंघोळीसाठी, इतर कामांसाठी केल्या जात आहे. त्यामुळे गरजु लोकांना पुरेसा पाणी उपलब्ध होत नाहीं.महत्त्वाच्या ठिकाणी आर ओ यंत्र बसविण्यात आल्याने पाणी टंचाई समस्या सुटली आहे.शहरातील पाणी प्याऊ बंद झाले आहेत तसेच पाणी पाऊच, पाणी बाॅटल, आर ओ कॅन विक्रीवर आळा बसल्याने व्यापारी वर्गाला नुकसानदायक ठरले आहे.
शहरवासीयाबरोबर प्रवाशी, विद्यार्थी, शिक्षक, यांना शुद्ध ठंड पाणी उपलब्ध व्हावे व रोगांपासून संरक्षण मिळावे आर ओ यंत्र बसविले आहेत. परंतु काही ठिकाणी शहरवासी दुरुपयोग करीत आहेत, अश्या तक्रारी आल्यामुळे लवकरच नगरपंचायत निर्णय घेवुन कारवाई करणार आहे.आशीष बारेवार नगराध्यक्ष गोरेगांव