५४५ ग्रापंना १७.४४ लाख रोपटे लावण्याचे उद्दिष्ट

0
14

गोंदिया,दि.06ः-यंदा राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याची मोहीम १ जुलै पासून सुरू होत आहे. महिनाभर करण्यात येणार्‍या या वृक्षारोपणात जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतींना १७ लाख ४४ हजार रोपटे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. हे रोपटे लावण्यासाठी जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २१ हजार १११ खड्डे खोदण्यात आले आहेत.
जुलै महिनाभर वृक्षारोपण मोहीम सुरू राहणार आहे. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी शासन व प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार आमगाव तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींना १ लाख ८२ हजार ४00 रोपटे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या तालुक्यात ६४ हजार २0५ खड्डे तयार करण्यात आले आहेत.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ह७0 ग्रामपंचायतींना २ लाख २४ हजार रोपट्यांचे उद्दिष्ट असताना ३ हजार १४0 खड्डे तयार करण्याता आले आहेत. देवरी तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींना १ लाख ७६ हजार रोपट्यांचे उद्दिष्ट ४ हजार ३७५ खड्डे तयार करण्यात आले आहेत. गोंदिया तालुक्यातील १0९ ग्रामपंचायतींना ३ लाख ४८ हजार ८00 रोपट्यांचे उद्दिष्ट असताना २८ हजार ३00 खड्डे तयार करण्यात आले आहेत. गोरेगाव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींना १ लाख ७६ हजार रोपट्यांचे उद्दिष्ट असताना ९ हजार ६0 खड्डे तयार करण्यात आहेत. सडक अर्जुनी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींना २ लाख १ हजार ६00 रोपट्यांचे उद्दिष्ट असताना १ हजार ७0१ खड्डे तयार करण्यात आले आहेत. सालेकसा तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींना १ लाख ३१ हजार २00 रोपट्यांचे उद्दिष्ट असतांना ७ हजार ६५0 खड्डे तयार करण्यात आले आहेत.
तिरोडा तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींना ३ लाख ४ हजार रोपट्यांचे उद्दीष्ट असताना तालुक्यात २ हजार ६00 खड्डे तयार करण्यात आले आहेत. आजची ही स्थिती असतानाही मे महिन्यात खड्डे खोदण्याचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.
वृक्षारोपण करण्यासाठी शासनाचे विविध विभाग पुढाकार घेणार आहेत. ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या कामात आपल्याही विभागाचा हातभार असावा या उदात्त हेतूने काही विभाग पुढे येत आहेत. तर काही विभागांना तेवढी रोपटी लावलीच पाहिजे, असे उद्दिष्ट देण्यात आले आहेत