पावणे दोन कोटी रुपये खर्चातुन करणार तलावांचे सौंदर्यीकरण

0
17

गोरेगाव,दि.०५:- येथील नगरपंचायत अंतर्गत पवन तलाव,काळा तलाव, चांभार बोडी असे तलाव येतात या तलावाची स्वच्छता, खोलीकरण,पेवींग ब्लाक,वूक्षारोपन,दगडांची पिचींग,एल ई डी हायमास्ट,पानघाट सौंदर्यीकरण कामाकरीता वैशिष्ट्य पुर्ण योजनेतुन १ कोटी ८० लाख रुपये मंजुर झाले असल्याने सौदर्यीकरण कामास सुरुवात करण्यात आली आहे
पवन तलाव १० हेक्टर ३९ आर क्षेत्रफळात पसरला आहे परंतु या तलावाचे सौंदर्यीकरण कामाकरीता नगरपंचायत ने लक्ष दिले नव्हते त्यामुळे युवा शक्ती स्पोर्ट्स क्लब व गायत्री परिवार यांनी तलावाचे सौंदर्यीकरण स्वच्छता करण्यासाठी श्रमदानातून दर रविवारी दोन तास कामास सुरुवात केली दरम्यान अनेकांनी श्रमदानातून कायापालट करण्याचा प्रयत्न केला गेला होता त्यातच जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दखल घेतली व मनरेगा अंतर्गत गाळ काढण्याचे कार्य करण्यात आले परंतु या तलावाचे क्षेत्रफळ जास्त असल्याने सौंदर्यीकरण करता आले नाही. नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी  सर्व नगरसेवकांना एका गोटात आणले आमदार विजय रहांगडाले यांनी गोरेगाव नगरपंचायतीच्या विकासाकामा साठी १० कोटी रुपये वैशिष्ट्य पुर्ण योजनेतुन खेचून आणले व विकास कामास गती मिळाली यात पवन तलाव,काळा तलाव, चांभार बोडी सौंदर्यीकरण कामाकरीता १ कोटी ८० लाख रुपये, खडीकरण रस्ते, सिमेंट रस्ते, नालीबांधकामाकरीता ८ कोटी २० लाख मंजूर करण्यात आले आहेत तलाव सौंदर्यीकरणांची कामे नगरपंचायतीने प्रगती पथावर सुरू केले असून खोलीकरण,मातीचे पाळीवर पुनर्भरण ,दगड पिचींग कामे सुरू करण्यात आली आहेत
नगराच्या विकासाबरोबर तलावाचे सौंदर्यीकरण, स्वच्छता,उपयोगीता या कामाकडे सर्व पक्षांचे नगरसेवक, नेते मंडळी यांचा सहकार्य लाभले आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविल्या जात आहेत.आशिष बारेवार ,नगराध्यक्ष गोरेगाव