30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ धावत्या ऑटोने घेतला पेट; दोन महिला भाजल्या

धावत्या ऑटोने घेतला पेट; दोन महिला भाजल्या

0
42

नागपूर,दि.22: शहरातील रविनगर भागातून जात असलेल्या एका ऑटोला आज शनिवारी दुपारी अचानक आग लागल्याने ऑटोत बसलेल्या दोन महिला काही प्रमाणात भाजल्या गेल्या तर बाकीचे प्रवासी सुरक्षित राहिल्याची घटना घडली.विदर्भातील पारा ४५ अंशाच्या पलिकडे जात असून त्याचे चटके पशुपक्ष्यांसह सर्वांनाच बसत आहेत. उन्हाच्या या तडाख्यात चालत्या ऑटोने अचानक पेट घेतल्याच्या घटनेने भर घातली आहे. दुपारच्या वेळी हा ऑटो रविनगर चौकातून जात असताना अचानक त्याला आग लागली. यात बसलेले प्रवासी घाबरले आणि त्यांनी आरडाओरड केली. ऑटो चालकाने प्रसंगावधान राखत त्याला रस्त्याच्या कडेला नेले. मात्र तोपर्यंत दोन महिलांना त्या आगीच्या झळांनी घेरले. या महिलांना जवळच्याच रुग्णालयात दाखल केले आहे.