जनावरांसह गावकèयांच्या वापरासाठी जलाशयातून पाणी सोडणार

0
19

गोंदिया,दि.२१ः-जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून गावातील तलाव व विहिरी आटल्याने जनावरासंह नागरिकांनाही पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने जलाशयातील पाणी सोडण्यात यावे असा मुद्दा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी मांडला होता.त्या मुद्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना मध्यमप्रकल्पातून पाणी सोडण्याची विनंती करण्यात आली होती.त्यावर जिल्हाधिकारी डॉ.कादबंरी बलकवडे यांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे.

चुलबंद जलाशयातून म्हसवानी,घोटी,बोथली,डव्वा,घाटबोरी(तेली)करीता १ दलघमी,सिरपूर जलाशयातून मकरधोकडा,शिलापूर,पदमपूर,फुकीमेठा व धारणीकरीता २ दलघमी तर ओवारा जलाशयातून रामाटोला,माळीटोला,वळद,कटंगटोला व कवळीकरीता १ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यास २१ मे रोजी मंजुरी प्रदान केली आहे.तसेच याकरीता लागणारे शासननिर्णयानुसारचे शुल्क जिल्हा परिषद गोंदियाकडून घ्यावे असे संबधित प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता यांना कळविण्यात आले आहे.यामुळे या परिसरातील नागरिकांसह जनावरांसाठीच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी निकाली निघालेला आहे.जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी सदर निर्णय घेतल्याबद्दल जिल्हाप्रशासनाचे आभार मानले आहे.