पालक सचिव डॉ.मुखर्जी आज गोंदियात

0
17

गोंदिया,दि. १५: जिल्ह्याचे पालक सचिव तथा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव डॉ.संजय मुखर्जी हे आज १५ जून रोजी गोंदिया येथे येत आहेत. १५ जून रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, टंचाई आराखड्याचे नियोजन आणि दुष्काळ निवारणाबाबत करावयाच्या विविध उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा आयोजित बैठकीत घेतील. बैठकीनंतर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देतील.