डवकीत आढळले नवजात अर्भक,कुत्र्यांनी केले रक्षण

0
18

गोंदिया,दि.24 : जिवंत नवजात शिशु कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आढळल्याची घटना रविवारी (दि.23) सकाळी देवरी तालुक्यातील डवकी येथे उघडकीस आली. सरपंच व गावकऱ्यांनी या नवजात शिशुला देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात केले. सध्या, हा नवजात शिशु सुखरुप असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.डवकी येथील सिध्दार्थ हायस्कुलच्या जवळील रस्त्याच्या कडेला हा नवजात शिशु आढळला त्या ठिकाणी तीन ते चार कुत्रे बसले होते. मात्र, त्यांनी या नवजात शिशुला कुठलही ईजा पोहचविली नाही.

प्राप्त माहितीनुसार, डवकी येथील सरपंच उमराव बावणकर हे नेहमीप्रमाणे रविवारी पहाटे फिरायला जात होते. त्यावेळी, सिध्दार्थ हायस्कूलच्या जवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर त्यांना नवजात बालकाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ जावून पाहिले असता एक नवजात जिवंत शिशु आढळले. त्यांनी लगेच याची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर त्याला देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या नवजात शिशुचा जन्म शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला असावा असे बोलले जात आहे. नवजात बाळाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर टाकून जाणारी आई कोण याचा शोध गावकरी व पोलीस घेत आहेत. रात्रभर हा नवजात शिशु कचऱ्यावरच पडून होता. तो जिवंत असून डवकीवासीयांच्या मदतीने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. नवजात शिशुला कचाऱ्यांच्या ढिगाऱ्यावर टाकून जाणारी ती र्निदयी माता कोण याचीच परिसरात आहे. रात्रभर नवजात शिशु कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पडून असूनही सुदैवाने सुखरुप असल्याने देवतारी त्याला कोण मारी असाच प्रयत्य आला. देवरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.