गोंदिया,दि.२३ः- सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या सामन्यादरम्यान सट्टा लावले जात असल्याची माहिती मिळाल्याने शहर पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या सिंधी काॅलनी परिसरातील एका चौकात बुधवार २२ मे रोजी रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास गोंदिया शहर पोलिसांच्या पथकाने एका दुकानात धाड घालून कारवाई केल्याची चर्चा आहे.या प्रकरणात एका दुकानदाराला रात्रीला ८ वाजेच्या दरम्यान चौकशीकरीता ताब्यात घेतल्यानंतर १०.३० वाजेच्या सुमारास सोडण्यात आल्याचेही वृत्त आहे.
विशेष म्हणजे सध्या गडचिरोली व नागपूर पोलीस आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान सट्टापट्टी लावणार्या क्रिकेटबुकींना ताब्यात घेत त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणात साहित्य जप्त करीत असल्याचे वृत्त प्रकाशितही झाले होते.मात्र गोंदिया जिल्ह्यात व शहरात अशी मोठी कारवाई अद्यापही झालेली नाही.त्यातच बुधवारच्या रात्रीला काॅलनीतील त्या दुकानात कारवाई करुन चौकशी करीता ताब्यात घेतलेल्या त्या व्यक्तीला नंतर सोडण्यात आल्याने ही कारवाई कशाची होती अशा चर्चांना उधाण आले आहे.तर दुसरीकडे क्रिकेटसट्ट्यावरील ही कारवाई गुलदस्त्यात की भविष्यात मोठी कारवाई करण्याच्यादृष्टीने पुर्व तयारी तर नसावी ना अशा चर्चांणा गोंदियाच्या बाजारात चर्चांणा उधाण आले आहे.