राष्ट्रवादीचे तहसिलदारांमार्फेत मुख्यमंत्र्यांना निवेदन 

0
22

तिरोडा दि.२९ : तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील विविध अडचणी व जून महिना संपत आला असतानाही पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणींमुळे मागण्यांचे निवेदन तहसीलदार तिरोडा यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना तिरोडा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आले. २६ जून रोजी माजी आ. दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वात डॉ. किशोर पारधी, नत्थू अंबुले, प्रदीप मेश्राम, माया शरणागत, जया धावडे, ममता आनंद बैस, नरेश कुंभारे, ममता हट्टेवार आदी कार्यकर्त्यांसह तिरोडा तहसीलदार संजय रामटेके यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात ११ वी, १२ वी, बी.ए., बी.कॉम, बी.एस्सीमधील कायम विना अनुदान शाळा महाविद्यालयातील प्रवेश फी रद्द करणे, मोसमी पाऊस वेळेवर न आल्याने पेरण्या खोळंबल्याने भविष्यात उत्पन्न कमी होण्याची शक्यता असल्याने तालुका दुष्काळग्रस्त घोषित करणे, खरीप धान कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०० रुपये बोनस देणे, कृषी पंपाकरिता वीजपुरवठा मागणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित वीज कनेक्शन देणे, रोहयो अंतर्गत केलेल्या अकुशल कामाचे वेतन तत्काळ देणे, बी.पी.एल. दाखले पंचायत समिती स्तरावरून न देता ग्रामपंचायत स्तरावरून देणे, रोहयोअंतर्गत केलेल्या कामाचे अनुदान त्वरित भरणे, शासकीय कार्यालयातील रिक्तपदे त्वरित भरणे, रब्बी धानाचे वेतन त्वरित देणे, धापेवाडा टप्पा २ ची बोदलकसा-चोरखमारा तलावाची पाइपलाइन ज्या शेतकऱ्याच्या शेतीतून जात आहे त्यांना त्वरित मोबदला द्या अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.