जिल्ह्यातील ११ पोलीस निरिक्षक व उपनिरिक्षकांच्या बदल्या

0
18

गोंदिया,दि.02 :संभाव्य विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  जिल्ह्यातर कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या १ जुलै रोजी पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी केल्या.त्यात गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे यांची बदली अर्जुनी-मोरगाव ठाणेदार म्हणून करण्यात आली.त्यांच्या जागेवर आमगाव येथील ठाणेदार उमेश पाटील यांना गोंदिया शहर ठाणेदार म्हणून नियुक्ती देण्यात आली. गोंदियाच्या नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांना आमगावचे ठाणेदार, नियंत्रण कक्षातील सचिन वांगळे यांना रावणवाडी ठाणेदार, रावणवाडीचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांना नियंत्रण कक्ष, नियंत्रण कक्षातील महादेव तोंदले यांना गोंदिया ग्रामीणचे ठाणेदार, गोंदिया ग्रामीणचे सुरेश नारनवरे यांना तक्रार अर्ज शाखा गोंदिया, नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांना देवरीचे ठाणेदार, नियंत्रण कक्षातील महिला पोलीस निरीक्षक वैशाली पाटील गंगाझरी, चिचगड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांना नक्षल आॅपरेशन सेल देवरीचे प्रभारी अधिकारी तर देवरीच्या नक्षल आॅपरेशन सेलमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल तवाडे यांना चिचगडचे ठाणेदार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.