सेवानिवृत्त पोलिस कर्मचार्‍यांचा गौरव

0
18

गडचिरोली,दि.03ः-पोलिस दलातून नियत वयोमानुसार सेवानवृत्त झालेल्या १४ पोलिस कर्मचार्‍यांच्या सत्कार सोहळय़ाचे आज पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेवानवृत्त कर्मचार्‍यांचा सहकुटुंब पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून गौरव करण्यात आला.
सेवानवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांमध्ये सहा. पोलिस निरीक्षक दिगांबर नामदेव गंधेवार, सहा. फौजदार गणपत डोनुजी सिडाम, सहा. फौजदार देवराव तुकाराम बोधनकर, गजानन विठ्ठलराव अवधूत, देविदास डुकरूजी नैताम, वासुदेव लक्षण कोरेत, दलीत भुजंग चांदेकर, पोलिस हवालदार तुकाराम अर्जुन रायपुरे, सहा. फौजदार देवराव दामाजी पदा, आनंदराव पैकाजी पोटावी, पोलिस हवालदार लोमेश्‍वर कवडुजी बाळबुद्धे, सतीश चोखोबाजी सोनडवले, सहा. फौजदार जयराम लहारू गोटा, पोलिस हवालदार भिमराव सिताराम मेर्शाम यांचा गौरव करण्यात आला. तसेच यावेळी सेवानवृत्त पोलिस हवालदार तुकाराम अर्जुन रायपुरे यांची कन्या प्राजक्ता रायपुरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील घेण्यात आलेल्या असिस्टंट इंजिनियर गृप ए मध्ये निवड झाल्याबद्दल तिला प्रोत्साहन म्हणून पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते १0 हजार रूपयांचे पारितोषिक, शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात आले.
यावेळी सेवानवृत्त पोलिस कर्मचार्‍यांनी पोलिस खात्यातील अनुभवांचे कथन केले. प्राजक्ता रायपुरे हिने गडचिरोली पोलिस दल राबवित असलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा फायदा झाला, असे सांगून आपण पोलिस कुटुंबात जन्माला आला याचा अभिमान असल्याचे सांगितले. कार्यक्रमास पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.