दोन वर्षाच्या प्रतीक्षेत असलेले खड्डे दोन दिवसात बुजविले

0
12

आमगाव ,दि.12: संलग्न दोन वर्षा पासून आमगाव ते कामठा मार्गाची दैनिय अवस्था झाली आहे खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा समजायला मार्ग नव्हते.यामुळे येथील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत होते आणि गड्डया मुळे अनेकांचे अपघात झाल्यांची माहिती राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ परिणय फुके यांना कळताच तत्काळ गड्डे बुजवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेे. अनं दोन वर्षाच्या प्रतीक्षेत असलेले खड्डे दोन दिवसात बुजविले गेले.
आमगाव ते कामठा मार्गामध्ये एक 2 किमी रस्ता व दुसरा 3 किमी चा रस्ता खूप जास्त खराब होते.याचं जाब सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारले असता निधी अभावी रस्ता दुरुस्त करण्याला असमर्थता दर्शवल्यामुळे येथील नागरिक हतबल होते. डॉ.परिणय फुके हे राज्याचे राज्यमंत्री आणि पालकमंत्री होताच त्यांच्या कार्यशैली आणि सर्वसामान्य विषयी असलेली तळमळ येथील नागरिकांना जाणिव होती.नागरिकांनी मंत्री डॉ.परिणय फुके यांच्या पर्यंत आपल्या समस्या पोहचविले.सर्वसामान्य जनतेच्या त्रासाची जाणिव होताच त्यांनी स्वीय सहाय्यकाला पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले .त्याच दिवशी (10 जुलै) सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्या सोबत रस्त्यांची पाहणी करून परिस्थितीशी अवगत केले. सर्वप्रथम तत्काळ गड्डे भरण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. नवीन रस्त्याचे प्रस्ताव त्वरीत पाठवावे असे ही सुचना यावेळी डॉ.परिणय फुके यांनी दिले. त्यामुळे 11 जुलै रोजी खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली.जे दोन वर्षात झाले नाही ते मंत्री महोदय यांनी दोन दिवसात केल्याबद्दल जनतेने त्यांचे आभार मानले.