महेश तिवारी यांना पू.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार जाहीर

0
12

गडचिरोली, दि. १९ : राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणार्या पत्रकारिता पुरस्कार २०१८ या वर्षासाठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  येथे केली. 1 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पत्रकार यमाजी मालकर यांना पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार जाहीर करण्यात आला. ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्य शासनामार्फत पत्रकार, छायाचित्रकार आदिंना देण्यात येणाऱ्या इतर विविध पत्रकारिता पुरस्कारांची मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज येथे घोषणा केली.

शनिवार दिनांक २७ जुलै रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या समारंभात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या समारंभात २०१६ आणि २०१७ या सालातील पत्रकारिता पुरस्कारांचे तसेच ‘महाराष्ट्र माझा शेतकरी राजा’ लघुचित्रपट स्पर्धा २०१६ आणि ‘महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा’ २०१७ आणि २०१८ यातील विजेत्यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.या वर्षीच्या पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) – महेश घनश्याम तिवारी, न्यूज 18 लोकमत चे प्रतिनिधी(तसेच महाराष्ट्र टाईम्सचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी) यांना जाहिर झाला आहे.यापुर्वी सुध्द्ा त्यांना मंत्रालय वार्ताहर संघाचा पुरस्कार मिळालेला आहे.त्यांना जाहिर झालेल्या पुरस्काराबद्दल गडचिरोली जिल्ह्यात त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.