तांबे, पितळवरील जीएसटी कमी करावी : खा. सुनील मेंढे

0
9

भंडारा,दि.20 : मोठ्या प्रमाणात असंघटित कामगारांना रोजगार मिळवून देणारा आणि जागतिक वारसा संस्थेतर्फे सांस्कृतिक वारसा म्हणून ज्या उत्पादन पद्धतीला मान्यता मिळाली आहे. अशा तांबे आणि पितळी भांडी उत्पादनावरील जीएसटी १२ टक्के वरून ५ टक्क्यावर आणावी अशी विनंती केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमन यांची दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन झालेल्या चर्चेत केल्याची माहिती खासदार सुनील मेंढे ह्यांनी दिली.झालेल्या चर्चेनुसार आगामी जीएसटी परिषदेत हा विषय चर्चेत आणणार असून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही सीतारमन ह्यांनी दिली असल्याचे मेंढे ह्यांनी नमूद केले.जीएसटी अमलात येण्यापूर्वी तांबे आणि पितळी भांडी उत्पादन वरील कर हा एकूण ७ टक्के होता. जीएसटीमध्ये तो १२ टक्के स्लॅबमध्ये आला आहे. करवाढ झाल्यामुळे ह्या उद्योगाला आर्थिक फटका बसला असून त्याचा परिणाम हा लोकांचा कल स्वस्तातल्या स्टील आणि अल्युमिनियमच्या भांड्यांकडे वाढला आहे. तसेच चांगल्या आरोग्यासाठी तांबे आणि पितळ हे अल्युमिनियम आणि स्टील पेक्षा अधिक उपयुक्तअसल्याचे आपल्याकडे वैद्यकीय शास्त्रात नमूद करण्यात आल्याचेदेखील आपण अर्थमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले असल्याचे मेंढे म्हणाले..