किसान सन्मान निधी आता प्रत्येक शेतकरी कुटुंबीयांसाठी-विनोद अग्रवाल

0
29
गोंदिया,दि.22 : भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होऊन पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधी सगळ्याच शेतकऱ्यांना लागू केली आणि वचननाम्यातील आपले पहिले वचन पूर्ण केले. याचा फायदा देशातील करोडो शेतकरी बांधवांना होणार असून किसान सन्मान योजनेत आणखी संशोधन करण्यात आले आहे. ज्यामुळे प्रत्येक ७/१२ वर शेतकरी बांधवांना ६ हजार रुपये देण्यात येणार आहेत. याने ४५ हजार नवे लाभार्थी या योजनेशी जोड्ल्या जाणार असून आणखी व्याप या योजनेचा वाढविण्याच्या विचारात भाजपा सरकार आहे, असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे पूर्व गोंदिया जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले. .
पुढे बोलताना अग्रवाल म्हणाले, जर ७/१२ वर परिवाराच्या प्रत्येक सदस्याचे नाव असेल तर एकालाच नाही तर आता पूर्ण परिवारासाठी ते ६ हजार रुपये असणार आहेत ज्यात पती, पत्नी आणि १८ वषार्खालील मुले यांना मिळून एक परिवार मानण्यात येईल. .

किसान सन्मान निधी अंतर्गत प्रति ७/१२ सरकारने ६ हजार रुपये देण्याचे ठरविले होते, मात्र गावात संयुक्त परिवार अशी पद्धत असल्याने त्याचा लाभ फक्त १ च परिवाराला होत होता. मात्र आता किसान सन्मान निधीमध्ये नवे संशोधन करण्यात आले असून जर एका ७/१२ मध्ये एका पेक्षा अनेक परिवार असतील तर प्रत्येक परिवाराला ६००० रुपये सरकार देईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. ग्राम दासगाव खुर्द येथील २५/१५ योजने अंतर्गत विठ्ठल रुख्मिणी मंदिर प्रांगणात सुशोभीकरण करण्यात येणार असून पेव्हर ब्लॉक लावण्याच्या कामाचा भमिपूजन सोहळा विनोद अग्रवाल यांच्या हस्ते पार पडला. यावेळी रामराज खरे, सरपंच मायाताई कोल्हे, उपसरपंच सूर्यभान चव्हाण, रेखलाल बिसेन, सुकलाल बोपचे, योगेश निखाडे, गौरीशंकर कोल्हे, कविता रहांगडाले, ममता तुमडाम, कविता दुधबुरे, ममता चौरे, इमलाबाई काटेवार, तसेच ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते..