निरज वर्मा ‘गोंदियाचे रॉकेट मॅन’;चंद्रयान-२ प्रक्षेपणाकरिता इसरो द्वारे निमंत्रित

0
11
गोंदिया ,दि.30ः-श्रीहरिकोटा येथील ‘इसरो’द्वारे २२ जुलै रोजी चंद्रयान २ च्या प्रक्षेपणासाठी गोंदिया शहरातील गड्ढाटोली येथील निरज वर्मा व त्यांची पत्नी रश्मी यांना आमंत्रित करण्यात आले होते. शहरातील निरज वर्मा यांना प्रक्षेपणाकरिता निमंत्रण येणे ही गोंदियासाठी गौरवाची बाब आहे. त्यांनी टाकाऊ वस्तू व प्लास्टिक पासून रॉकेटचा मॉडेल (जीएसएलव्ही एमके-३) तयार केले होेते. याकरिता त्यांना ‘गोंदियाचे रॉकेट मॅन’च्या नावाने ओळख झाली असून श्री चित्रगुप्त कायस्थ समाजातर्फे निरज वर्मा यांचा सत्कार करण्यात आला.
श्रीहरिकोटा येथून नुकतेच चंद्रयान-२ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपणासाठी श्रीहरिकोटा येथे ‘इसरो’द्वारे चंद्रयान २ च्या प्रक्षेपणात शहरातील गड्ढाटोली येथील निरज वर्मा व त्यांची पत्नी रश्मी यांना आमंत्रित करण्यात आले होते.त्यांनी टाकाऊ वस्तू व प्लास्टिक पासून रॉकेट (जीएसएलव्ही एमके-३)चे मॉडेल तयार केले होेते.  त्यामुळे निरज वर्मा यांना ‘गोंदिया रॉकेट मॅन’च्या नाव देण्यात आले आहे. ही बाब जिल्ह्यासाठी गौरवपूर्ण आहे. विशेष म्हणजे या प्रक्षेपणासाठी निरज वर्मा यांनी आपल्यासोबत जिल्ह्यातील तब्बल ७० विद्यार्थ्यांना घेवून गेले होते.  निरज वर्मा यांची निवड प्रक्षेपणाकरिता निमंत्रण येणे ही समाज व गोंदियासाठी गौरवाची बाब आहे. त्यामुळे समाजाच्या वतीने नुकतेच त्यांचा सत्कार करण्यात आले. योगेश वर्मा यांच्या निवासस्थानी २८ जुलै रोजी चित्रगुप्त कॉलनी येथे आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी कायस्थ समाजाचे अध्यक्ष कमलेश श्रीवास्तव होते. यावेळी समाजाच्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान समाजाचे व गोंदियाचे नाव गौरान्वित करणारे निरज वर्मा यांच्या कायस्थ समाजाच्यावतीने पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
सभेचे संचालन अमित श्रीवास्तव यांनी तर आभार कमलेश श्रीवास्तव यांनी मानले.  यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष विरेंद्र वर्मा, रामकुमार श्रीवास्तव, सचिव अमित श्रीवास्तव, सहसचिव प्रदिप श्रीवास्तव, रतन श्रीवास्तव, सदस्य रमेश श्रीवास्तव, मनोज खरे, संजय वर्मा, मनिष श्रीवास्तव, श्रीमती मोना श्रीवास्तव, अंजू वर्मासह आदींनी सहकार्य केले.
सायन्स पार्क बनविण्याची इच्छा – निरज वर्मा
विज्ञान विषयाची मला लहानपणापासून आवड होती. विज्ञान विषयाचा प्रचार-प्रसार करणे हे माझे ध्येय असून मी मागासलेल्या मुला-मुलींना विज्ञानाची माहिती देवून त्यांना प्रोत्साहित करण्याचे कार्य आपल्या संस्थेमार्फत करतो. गोंदिया जिल्ह्यात आपल्या वडीलाच्या नावाने सायन्स पार्क बनविण्याची माझी इच्छा आहे, असे निरज वर्मा यांनी सांगितले.