25.5 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ जयनाबाई चाचेरे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

जयनाबाई चाचेरे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

0
46

गोरेगाव,दि.०१ः-स्थानिय पी.डी.रहागंडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालातील कार्यरत परिचर जयनबाई चाचेरे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार ३१ जुर्ले रोजी करण्यात आला.त्यांनी विद्यालयाला आपली २९ वर्ष सेवा दिली.सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.टी.बी.येळे होते.तसेच संचालक यु.टी.बिसेन,मुख्याध्यापक एच.डी.कावळे,पर्यवेक्षक वाय.आर.चौधरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे संचालन ए.एच.कटरे यांनी केले,तर आभार सौ.एम.डी.रहागंडाले यांनी मानले.यशस्वीतेसाठी वाय.के.चौधरी,टी.डी.पटले, आर.वाय.कटरे, एस.आर.रहांगडाले, आर.टी.पटले,डी.एम.राठोड,सौ.व्ही.पी..कटरे,सौ.एस.पी.तिरपुडे,सौ.ए.एस.बावनथडे, यु.जी.लांजेवार, एम.बी.येळेकर व बि.एन.गौतम यांनी सहकार्य केले.