शेतकऱ्यांसाठी शिवणकरांनी राजकारणात सक्रिय व्हावे-फरांदे

0
13

आमगाव : दिनदलित व शेतकऱ्यांसाठी महादेवराव शिवणकरांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याची गरज आहे. त्यांच्या विदर्भाच्या विकासात सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनीचे कार्यवाह न.था.फरांदे यांनी केले.

ते बनगाव येथील ग्रामोत्थान व जनकल्याण संस्थाव्दारे आयोजित नेत्र तपासणी, दंत रोग तपासणी, रक्तदान आणि माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात मंगळवारी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी महादेवराव शिवणकर, माजी आ.हरिहरभाई पटेल, भेरसिंह नागपुरे, डॉ.बुलाखीदास कलंत्री, जि.प, अध्यक्ष विजय शिवणकर, डॉ. रूचा बाम्हणकर, मधुकर कुकडे, पंचम बिसेन, नरेश माहेश्वरी, कमल बहेकार, तुंडीलाल कटरे, रमेश अग्रवाल, सुखराम फुंडे, बालाराम अग्रवाल, सविता बघेले, उषा हर्षे, देवचंद तरोणे, मनोहर चंद्रिकापुरे, बबलू कटरे, विनोद हरिणखेडे, गंगाधर परशुरामकर, दिनदयाल चौरागडे, टिकाराम मेंढे, मनोज मेंढे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी महादेवरा शिवणकर म्हणाले, सध्या शेतकऱ्यांची स्थिती जैसे थे तसीच आहे. सरकार कोणतेही असो अन्न निर्माता व गरीबांचा विचार करणारी सरकार असावी, जे एक गटातील लोक गोहत्याचा कांगावा करतात त्यांच्याकडे तरी जनावरे आहेत का? प्रतिनिधी ठेकेदार झाले यातून बाहेर पडून लोककल्याणाकडे लक्ष दिले पाहिजे. शेतकऱ्यांची स्थिती शास्त्रयुक्त पध्दतीतून सुधारित करण्यासाठी मागील चार महिन्यापासून शेतात प्रात्यक्षिक सुरु आहे.

प्रास्ताविक एम.डी.कटरे यांनी केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचे सत्कार करण्यात आला.

शिबिरात २५०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. संचालन प्राचार्य सी.जे. पाऊलझगडे, राष्ट्रगीत सिध्दार्थ डोंगरे व आभार एम.डी.पटले यांनी मानले.

यशस्वीतेसाठी प्राचार्य पी.आर. पटेल, सी.जी. पाऊलझगडे, संजय शिवणकर, जे.ए.मेश्राम, बी.बी. तिडके, व्ही.एस. दिहारी, व्ही.डी. बिसेन, गावळकर, प्रकाश कापगते, वाय.एन.पाठक, विजय रगडे, मोरेश्वर चापले, तिरथ येटरे, सचिन ढेंगे, मकरंद पांडे, नरेंद्र शिवणकर, देवेंद्र मच्छिरके, प्रफुल ठाकरे, मंगेश चुटे, मुन्ना कटरे व ग्रामोत्थान, जनकल्याण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.