24.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम आज

जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम आज

0
247

गोंदिया,दि.09 : आदिवासी समाज संघटनेच्या जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमाचे आयोजन ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता तेजस्विनी लॉन सडक अर्जुनी येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष भरतभाऊ मडावी यांच्या हस्ते आदिवासी सल्लागार तेजराम मडावी यांच्या अध्यक्षतेत करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून आदिवासी गोवारी मिशन गोंडवानाचे संयोजक दामोदर नेवारे, आदिवासी पिपल्स फेडरेशनचे अध्यक्ष जागेश्वर धनभाते,  आदिवासी युथ फेडरेशनचे अध्यक्ष जगदिप खंडाते उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून माजी उपसभापती प्रकाशबापू मडावी, माजी सभापती निर्मलाताई ऊईके, चंद्रकांत मरस्कोल्हे, किरणताई गावराणे, अर्जुन घरोटे, टि.के.मारगाये, ताराबाई मडावी, महेंद्र मसराम, शिलाताई प्रधान, भोजराज मसराम आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येत समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आदिवासी कर्मचारी संघटना, नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन, नॅशनल आदिवासी युथ फेडरेशन, आदिवासी विद्यार्थी संघ व आदिवासी समाजाची संलग्न संघटनांनी केले आहे.