कावळ यात्रेत गेलेल्या युवक वाघनदीत बुडाला

0
19

गोंदिया,दि.११ः येथूनच जवळच असलेल्या रजेगाव कोरणीघाट (गोंदिया-बालाघाट रोड) येथे सेल्फी घेताना येथील न्यु लक्ष्मीनगर निवासी राजेश आसाराम मरसकोल्हे १७ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला.कावळयात्रेत हा मुलगा नदीघाटावर पाणी घेण्यासाठी गेलेला असताना नदी किनारी सकाळी ९ च्या सुमारास सेल्फी घेताना बुडाला. एक मुलगा (कावडिया) बुडाला आहे, सदर माहिती पोलीस नियंत्रण कक्ष येथून प्राप्त झाली असून शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.