पवार प्रगतीशील मंच गोंदियाची कार्यकारिणी गठीत;अध्यक्षपदी अ‍ॅड. चव्हाण

0
13

गोंदिया,दि.१३ : पवार प्रगतीशील मंच गोंदियाची सन २०१९-२२ पासून कार्यकारिणीचे गठन सर्वानुमते करण्यात आली. कार्यकारिणीच्या गठणासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला होता. मात्र सर्व नामांकित उमेदवारांनी समाज हितासाठी नामांकन मागे घेत कार्यकारिणीचे गठन एकमताने करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने समितीचे गठीत करण्यात आले. कार्यकारिणी मंडळाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. पृथ्वीराज चव्हाण यांची नवनियुक्ती संचालक मंडळातील सदस्यांनी निवड केली.
पवार प्रगतीशील मंचच्या कार्यकारिणी मंडळात अध्यक्ष अ‍ॅड. पृथ्वीराज चौहान, उपाध्यक्ष दिनेश हरिणखेडे, सचिव प्रिती गौतम, सहसचिव हुपेंद्र बोपचे, कोषाध्यक्ष सुरेश पटले, संघटन सचिव अजय रहांगाडाले, प्रचार प्रमुख महेंद्र बिसेन, तर सदस्यपदी सौ. रश्मी रहांगडाले, छत्रपाल बिसेन, पन्नालाल ठाकरे, हेमंत बघेले, गौरव तुरकर, पंकज पटले, दिलीप पारधी, अ‍ॅड. रजत ठाकूर यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यासाठी समाजाच्या वरिष्ठांनी सहकार्य केले. तर निवडणूक प्रक्रिया पार पाडून सर्वानुमते निवड करण्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून राजेश राणे यांनी भूमिका पार पाडली.