24.6 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ जांभूळखेडा व अरततोंडी ग्रामपंचायतीचे आदर्श ग्राम स्पर्धेसाठी मूल्यांकन 

जांभूळखेडा व अरततोंडी ग्रामपंचायतीचे आदर्श ग्राम स्पर्धेसाठी मूल्यांकन 

0
35

गडचिरोली,दि.28 – महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना अंतर्गत  गडचिरोली  जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा व अरततोंडी ग्रामपंचायतीमध्ये आदर्श ग्राम स्पर्धेच्या मूल्यांकनासाठी स्पर्धेच्या समितीतर्फे गावाची पाहणी करण्यात आली.   याप्रसंगी  पोपटरावजी पवार (सरपंच हिवरे बाजार व कार्याध्यक्ष, आदर्श ग्राम स्पर्धा) ,प्रमोदजी शिंदे ( उपसचिव ,महाराष्ट्र शासन ) , ज्ञानेश्वर बोटे ( कृषी सहसंचालक, महाराष्ट्र शासन), गणेश तांबे ( उपसंचालक),प्रफुल्ल रंगारी  ( VSTF Mission Manager), कु.ख्याती मॅडम  ( VSTF Mission Associate),श्रीकांत राठोड  (VSTF जिल्हा समन्वयक, गडचिरोली)  इत्यादी मान्यवर या समिती मध्ये होते.
पोपटराव पवार यांनी यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधत व्हीएसटीएफच्या माध्यमातून गावात झालेल्या विकासकामांची पाहणी केली. ग्रामपरिवर्तक यांनी केलेले विशेष कामे, ग्रामपंचायतचा आढावा व दस्तऐवज, लोकसहभाग, वृक्षसंवर्धन , स्वच्छता मोहीम, राजस्व अभियान, आरोग्य व पोषण, शेतकरी व शेती मधील बदल , शाळा मधील शैक्षणिक बदल, अंगणवाडी तपासणी, शोषखड्डे , व्यसनमुक्ती, सामाजिक झालेले बदल, रोजगार निर्मिती चारोली प्रकल्प, महिला व पुरुष बचत गट,मनरेगा ची कामे  पाहण्यात आली.  या  भेटी दरम्यान  ग्रा.प. चे सर्व कर्मचारी, पदाधिकारी, महिला बचत गट, शिक्षक वर्ग, ग्रामस्थ, सर्व समितीचे अध्यक्ष ,गावकरी व विद्यार्थी उपस्थित होते.
पोपटराव पवार म्हणाले,” पाण्याचा स्तर आणि पाणी उपलब्धतेकरीता गावातील शेततळे, विहिरी यातील गाळ काढणे आवश्यक आहे. गावातील परिसर स्वच्छ ठेऊन शाळा, अंगणवाडी यांची देखभाल करणे गरजेचे आहे. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी शोषखड्डे असायला हवेत. तसेच गावात १०० टक्के शौचालये असून सर्वांनी त्याचा वापर करायला पाहिजे.”

blank