माजी खासदार पटलेंचा पवनारखारी,सितासावंगीच्या शेतक-यांशी सवांद

0
4

तुमसर,दि.30ः- तालुक्यातील सितासावंगी, गोबरवाही, येदरबुची व परिसरातील शेतक-यांची भेट घेऊन त्यांच्या सिंचनाच्या समस्या भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिशुपाल पटले यांनी गुरुवारला भेट देऊन जाणून घेतल्या.यावेळी शेतक-यांनी लोभी पवनारखारी सितासावंगी येथील प्रस्तावित लिफ्ट एरिगेशन योजनेचे कार्य रखडल्यामुळे शेतीला लाभ होत नसल्याची तक्रार पटले यांचेकडे केली.सदर योजना कार्यान्वित होत नसल्यामुळे गोबरवाही परिसरातील बारा गावांना एका पाण्यासाठी हातचे पीक घालवावे लागते.सदर योजनेचे कार्य त्वरित सुरु व्हावे याकरिता शिशुपाल  पटले यांनी स्वत: त्या गावांमध्ये जाऊन शेतक-यांच्या समस्या जाणुन घेतल्या व काही शेतक-यांना सोबत घेऊन पवनारखारी, डोंगरी बू. व लोभी येथील तलावांना भेट देऊन योजनेच्या जागेची पाहणी केली.यावेळी परिसरातील अनेक कार्यकर्ता आणि जनता उपस्थित होती. पाहणी करतांना बाळकृष्ण गाढवे पं स सदस्य,साईनाथ उईके सरपंच गोबरवाही, शरदभाऊ खोब्रागडे, रामरावजी डांगरे, कुसनजी बुराडे, जुगलकिशोर बघेल, रामकिशन मसराम, देवेंद्र अवथरे, दौलत जी झंझाड, प्रदिप जी वाघमारे, बंडुभाऊ सपाटे हे प्रामुख्याने उपस्थित होते.