प्रोग्रेसिव्ह शाळेचे फुटबॉल स्पध्रेत सुयश

0
7

गोंदिया,दि.30 : प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थीनींनी जिल्हा क्रीडा अधिकारी गोंदिया द्वारा आयोजित १४ वर्षीय वयोगटातील फुटबॉल स्पध्रेत उत्कृष्ठ प्रदर्शन करून जिल्हास्तरीय स्पध्रेत प्रथम स्थान मिळवून विभागीय स्तरावर आपले नाव नोंदविले आहे.
जिल्हास्तरीय स्पध्रेत विजयी झालेल्या संघाला जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते स्वर्ण पदक देवून गौरविण्यात आले. विजयी संघाची कर्णधार नम्रता नेताम, कोच सपना बावने व मंगला कटरे यांनाही जिल्हा क्रीडा अधिकारी द्वारे शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचप्रकारे प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनीही १४ वर्षीय मुलांच्या वयोगटात जिल्हा स्तरीय फुटबॉल स्पध्रेत रजत पदक प्राप्त केले. प्रशिक्षक ज्योति पहिरे, मुकेश शेंडे यांच्या नेतृत्वात कर्णधार गौराग चौव्हानच्या संघानी उत्कृष्ठ प्रदर्शन करीत आयोजकांची मने जिंकली.
या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष डॉ. पंकज कटकवार, सचिव डॉ. निरज कटकवार, प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, कुमुदिनी तवाडे, वाय.आशा.राव, मिनाक्षी महापात्रा, वर्षा सतदेवे, विकास पटले, रूपकला रहांगडाले, प्रमोद वाडी, राहुल रामटेके, दिव्यांशु जैस्वाल, क्रीडा शिक्षक हेमा नायडू, खुशबू बांगडकर, फालेंद्र मेंढे, संगम बावनकर व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर ने यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.