23.5 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ सुकळी / खैरी तंमुस च्या अध्यक्षपदी पंचशिला मेश्राम यांची निवड

सुकळी / खैरी तंमुस च्या अध्यक्षपदी पंचशिला मेश्राम यांची निवड

0
24

अर्जुनी मोर.,दि.30 :–तालुक्यातील गटग्रामपंचायत अंतर्गत येणा-या सुकळी .खैरी व बोळदे गावाच्या तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष पदी माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पंचशिला भोजराज मेश्राम यांची एकमताने निवड करण्यात आली. सुकळी खैरी बोळदे गटग्रामपंचायत ची ग्रामसभा 28 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच लालसिंह चंदेल होते.विषयसुचीनुसार तंमुस च्या अध्यक्ष निवडण्याचा विषय येताच दयाराम राऊत .सुत्तम लांडगे व पंचशिला मेश्राम यांची नावे समोर आली. मात्र ग्रामसभेने पंचशिला मेश्राम यांचे नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे पंचशिला मेश्राम यांची एकमताने तंटा मुक्त गांव समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. पंचशिला मेश्राम यांची तंमुस च्या अध्यक्षपदी निवड झाल्याने सुकळी खैरी व बोळदे येथील ग्रामवासियांनी अभिनंदन केले आहे.

blank