गोंदिया,दि.02 : पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. या आरसाच्या प्रतिqबबातून समाजात चांगले कार्य करणाèयांचा चेहरा ते ओळखतात. याचीच प्रचीती आजच्या कार्यक्रमात येत आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाèयांचा होत असलेला सत्कार हा सत्कारमूर्तींसह इतरांनाही भविष्यात प्रेरणा देणारा असून या पुरस्कारामुळे त्यांच्या कर्तव्याची जाणीवही वाढीस लागते, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री आ. राजकुमार बडोले यांनी केले.
ते रविवार, १ सप्टेंबर रोजी ग्रँड सिता हॉटेलमध्ये प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाच्या चौथ्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रामुख्याने नगराध्यक्ष अशोक इंगळे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद अग्रवाल, अदानी उर्जा प्रकल्पाचे प्रमुख सी. पी. साहू, प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचे अध्यक्ष अपूर्व मेठी, सचिव रवी आर्य, उपाध्यक्ष व संयोजक जयंत शुक्ला यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलातना आ. बडोले म्हणाले की, प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया ही पत्रकारांची संस्था समाजात काही देणे आहे या उदात्त उद्देशाने कार्य करित आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष अशोक इंगळे म्हणाले, पत्रकारांनी आपल्या लेखणीतून टिका जरुर करावी, परंतु ती हेतुपुरस्पर नसावी. लेखणीतील टिका शासन, प्रशासनाला मार्गदर्शक ठरते. पत्रकारांच्या भवनासाठी शहरात जागा देण्यासाठी आम्ही नगर परिषदेत ठराव केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. गजानन डोंगरवार यांना स्व. रणजीतभाई जसानी स्मृति जिल्हा गौरव सामाजिक सेवा पुरस्कार, माणिक गेडाम यांना स्व. रामदेवजी जायस्वाल स्मृती जिल्हा गौरव साहित्यरत्न पुरस्कार, ॠषीकुमार टेंभरे यांना स्व. फाल्गुनराव पटोले स्मृती जिल्हा गौरव कृषीरत्न पुरस्कार, अनंत वालस्कर यांना स्व. रामकिशोर कटकवार स्मृती जिल्हा गौरव कर्तव्यनिष्ठ पुरस्कार, प्रा. अनिल मंत्री यांना स्व. मोहनलाल चांडक स्मृति शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार व ज्येष्ठ पत्रकार रमणकुमार मेठी यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याचप्रमाणे सर्वसमाज मोक्षधाम सेवा समिती गोंदिया यांचा सामाजिक सेवा व खालसा सेवा दल यांचा मानवसेवा कार्यात उल्लेखनीय कामासाठी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रेस ट्रस्ट ऑफ गोदियातर्फे राज्यातील पुरग्रस्तांसाठी ११ हजार रुपयांचा धनादेश उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आला.
संचालन संतोष शर्मा यांनी तर आभार नरेश रहिले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोषाध्यक्ष हिदायत शेख, सहसचिव राहूल जोशी, कार्यकारिणी सदस्य अंकूश गुंडावार, कपित केकत, हरिंद्र मेठी, मुकेश शर्मा, नरेश रहिले, जावेद खान, आशिष वर्मा, योगेश राऊत, बिरला गणवीर, उदय चक्रधर, दीपक जोशी, अर्चना गिरी, प्रमोद नागनाथे, भरत घासले, नरेंद्र सिंद्रामे अन्य सदस्यांनी प्रयत्न केले.




