26.9 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ म्हसवानी नाल्याच्या पुरात युवक वाहून गेला

म्हसवानी नाल्याच्या पुरात युवक वाहून गेला

0
39
सडक अर्जुनी,दि.२: जिल्ह्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. सतत दोन तास पाऊस पडल्याने जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव येथे अतिवृष्टी झाली असुन या तालुक्यात येत असलेल्या किशोरी गावाजवळील धोबी नाल्यावरून ३ ते ४ फूट पाणी वाहत असुन या ठिकाणावरून वाहतूक बंद झाली अाहे.या ठिकांतील तीन ते चार गावांचा संपर्क तुटलेला आहे. या मुळे या गावातील लोकांना बाजार करण्यासाठी केशोरी या ठिकाणी बाजार करण्यासाठी यावे लागते. गणेश स्थापना असुन गरजेच्या वस्तू घेण्यासाठी जाणारा मार्ग बंद झाला आहे. तसेच यामार्गावरून गडचिरोली जिल्ह्याचा मार्ग हि बंद झालेला आहे.आज सोमवारी पहाटे तीन वाजतापासून आलेल्या पावसामुळे नाले दुथळी भरून वाहत आहेत. अनेक पुलांवरून पाणी वाहत आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील बोथली ते म्हसवानी दरम्यान असलेल्या नाल्याला पूर आले होते. आज सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास म्हसवाणी येथील कार्तीक सोमेश्वर गौतम( वय १८) हा युवक नाल्यात आंघोळीकरिता गेला होता. दरम्यान पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला. स्थानिक नागरिकांनी शोधमोहिम हाती घेतली. परंतु, बातमी लिहीपर्यंत तो मिळाला नाही.
अर्जुनी मोरगावात अनेक मार्ग बंद
दमदार पावसामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अनेक मार्गांवर असलेल्या नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक मार्गांवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने मार्गावरील वाहतूक बंद होती. त्यात चिचोली ते केशोरी, सिरोली ते माहुरकुडा, अरततोंडी ते परसवाडा, गवर्रा ते परसटोला, केशोरी ते वारव्ही, केशोरी ते खोळदा, बोरी ते महागाव या मार्गांचा समावेश आहे.