गोंदिया,दि.02 : आरोग्य व स्वच्छता या दोन्ही बाबी लक्षात घेऊन शासनाकडून महिला संदर्भिय विभागाकडून सॅनिटरी नॅपकीन वाटप करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात ‘उमेद’ च्या माध्यमातून
काही बचत गटाच्या महिलांना नॅपकीन वाटप करण्यात आले आहे. मात्र, हे नॅपकीन अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून त्याचा वापरही योग्यरितीने करू शकत नाही. यामुळे विना वापर हे नॅपकीन
कचराकुंड्यात जात आहेत. या माध्यमातून शासनाच्या पैश्याचा चुराडा केला जात आहे, अशा आरोपाची चर्चा विना तक्रारी गुपचूप करित आहेत. महिलांचे आरोग्य आणि स्वच्छतेचे प्रश्न मार्गी
लावण्याच्या अनुषंगाने सॅनिटरी नॅपकीनचा वापर आणि त्याचे विल्हेवाट लावण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती शासनाकडून केली जात आहे. त्याच प्रमाणे महिला संदर्भिय विभागाकडून महिला
व युवतींना नॅपकीनचा पुरवठाही केला जात आहे. जिल्ह्यात ‘उमेद’ च्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना सॅनिटरी नॅपकीन पुरवठा करण्यात आला आहे. यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळच्या नेतृत्वात समिती स्थापित करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून महिला बचत गटाची निवड करुन सॅनिटरी नॅपकीन वाटप करण्यात आली आहे. मात्र, वाटप करण्यात आलेली नॅपकीन अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे. एवढेच नव्हे तर त्या नॅपकीनचा वापरही योग्य रितीने होत नाही.त्यामुळे विनावापर त्या नॅपकीन थेट कचराकुंड्यात जात आहेत.यामुळे शासनाच्या निधीला नॅपकीन पुरवठयाच्या माध्यमातून चुना लावला जात आहे, अशा चर्चा व आरोप महिला निकृष्ट नॅपकीन पुरवठ्यावरून दबक्या आवाजात करु लागल्या आहेत. तर दुसरीकडे यंत्रणेतील अधिकारी थेट शासनाकडूनच पुरवठा होत असल्याने या बाबतीत बघ्याची भूमिका बाजावत आहेत.





