भंडारा,दि.14ः-भंडारा, तुमसर रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण, वरठी येथे एफओबीची सोय करणे, या विषयांसोबत गोंदिया रेल्वे स्थानकावर लिफ्ट एक्सलेटर सतत सुरु ठेवणे, ंड्रॉप अँन्ड गोची सुविधा उपलब्ध करून देणे ई. विविध विषयांच्या अंमलबजावणी साठी खासदार सुनील मेंढे यांनी डीआरएम/एसईसीआर शोभना बंडोपाध्याय यांच्यासमवेत नुकतीच आढावा बैठक घेऊन चर्चा केली.
यावेळी रेल्वे अधिकारी वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता राजेश सिंग, वरिष्ठ विभागीय अभियंता अरविंद विश्वकर्मा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तआशुतोष पांडे, विभागीय सांकेतिक व दूरसंचार अभियंता हरीश कुमार साहू वरिष्ठ, वरिष्ठ सहाय्यक अभियंताहरीश कुमार महिंद्रा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य अभियंता के. व्ही. रामन्ना, वरिष्ठ विभागीय अभियंता ए. के. सूर्यवंशी, तसेच रेल्वे सल्लागार समितीचे सेवक कारेमोरे, भरत भलगट, विजय खंडेरा देखील उपस्थित होते.
बैठकीत झालेल्या चर्चेत बिलासपूर- पुणे राजधानी एक्सप्रेसला भंडारा रोड स्थानकावर थांबा देण्यासाठी देखील चर्चा झाली असून भंडारा रोड स्थानकावर दिव्यांगा साठी सोय, वरठी बस स्थानक या सर्व विषयांवर देखील सविस्तर चर्चा झाली असल्याचे खासदार मेंढे म्हणाले.या सर्व बाबींची पूर्तता लवकरात लवकर करणे संदर्भात शोभना बंडोपाध्याय यांनी संबधित अधिकार्यांना सूचना दिल्या व त्याचा वेळेवर आढावा घेण्याच्या सूचना देखील केल्या आहेत.




