वाशिम, दि. १९ : जिल्ह्यात १ ऑक्टोंबरपासून फिरती लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. यामाध्यमातून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात जावून तेथील नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे.वाशिम तालुक्यामध्ये १ ऑक्टोंबर रोजी वाशिम शहर पोलीस स्टेशन, २ ऑक्टोंबर रोजी तोंडगाव ग्रामपंचायत कार्यालय, ३ ऑक्टोंबर रोजी अनसिंग ग्रामपंचायत कार्यालय, ४ ऑक्टोंबर रोजी तामसी ग्रामपंचायत कार्यालय, मालेगाव तालुक्यात ५ ऑक्टोंबर रोजी अमानी ग्रामपंचायत कार्यालय, ७ ऑक्टोंबर रोजी शिरपूर ग्रामपंचायत कार्यालय, ९ ऑक्टोंबर रोजी जऊळका ग्रामपंचायत कार्यालय, रिसोड तालुक्यात १० ऑक्टोंबर रोजी मोप ग्रामपंचायत कार्यालय, ११ ऑक्टोंबर रोजी मसला पेन ग्रामपंचायत कार्यालय, १४ ऑक्टोंबर रोजी रिठद ग्रामपंचायत कार्यालय, मंगरूळपीर तालुक्यात १५ ऑक्टोंबर रोजी शेलूबाजार ग्रामपंचायत कार्यालय, १६ ऑक्टोंबर रोजी धानोरा ग्रामपंचायत कार्यालय, १७ ऑक्टोंबर आसेगाव ग्रामपंचायत कार्यालय, कारंजा तालुक्यात १८ ऑक्टोंबर रोजी सोमठाणा ग्रामपंचायत कार्यालय, १९ ऑक्टोंबर रोजी कामठवाडा ग्रामपंचायत कार्यालय, २१ ऑक्टोंबर रोजी उंबर्डाबाजार ग्रामपंचायत कार्यालय, मानोरा तालुक्यात २२ ऑक्टोंबर रोजी कारखेडा ग्रामपंचायत कार्यालय, २३ ऑक्टोंबर रोजी गिरोली ग्रामपंचायत कार्यालय व २४ ऑक्टोंबर रोजी कार्ली ग्रामपंचायत कार्यालय येथे फिरती लोक अदालत व विधी साक्षरता शिबीर होईल, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे यांनी कळविले आहे.




