गोंदिया,दि.20ः- सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी निवासी व दुरदर्शनचे अधिकारी, फुलीचंदजी भगत विद्यालय कोसमतोंडीचे संस्थापक,राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभा व नागपूर कुकडे ले आऊट पोवार संघटनेचे कार्यकारीणी सदस्य जगदीशजी येळे यांचे आज वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारला सकाळी १० वाजता त्यांचे जन्मगाव कोसमतोंडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.गेल्या आठवड्यात गोंदिया तालुक्यातील ढाकणी येथील एका कार्यक्रमादरम्यान विचार व्यक्त करीत असताना त्यांची प्रकृती खालावली होती.त्यानंतर त्यांना नागपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.त्या उपचारादरम्यान आज त्यांचे निधन झाले.त्यांच्या निधनाने सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे अध्यक्ष इंजि.मुरलीधर टेंभरे,संघटन सचिव खेमेंद्र कटरे,माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,नाना पटोले आदींनी शोकसंवेंदना व्यक्त केल्या आहेत.




