गोंदिया,दि.21 : जिल्ह्यात मनरेगाच्या माध्यमातून सन २०१७-१८ व २०१८-१९ मधील ग्रामपंचायतस्तरावर झालेल्या विकास कामातील कुशल कामाचे 17 कोटी रुपयाचा निधी अद्याप उपलब्ध न झाल्याने इतर विकास कामात अडथळा निर्माण होत असल्याने तो तत्काळ उपलब्ध करुन द्यावा या मागणीसाठी मनरेगाचे नागपूर विभागीय सह आयुक्त फुटाणे यांना निवेदन(दि.20) देण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने फुटाणे यांची भेट माहिती दिली.तसेच जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करुनही त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती देण्यात आली.यावर सह आयुक्त फुटाणे यांनी 15 दिवसात सर्व निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.शिष्टमंडळात जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर,सरपंच दिनेश कोरे,शिवाजी गहाणे,हेमराज खोटेले,नाजुक झिंगरे,मोहन सुरसावत,माधव हटवार,नरेश चव्हाण यांचा समावेश होता.




