29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ रांगोळीतून ‘वोट फॉर बेटर इंडिया’चा संदेश

रांगोळीतून ‘वोट फॉर बेटर इंडिया’चा संदेश

0
106

Ø  मतदारांना केले रांगोळी स्पर्धेतून आवाहन

Ø  स्विप कार्यक्रमाची आर.एम. पटेल कॉलेजमध्ये जनजागृती

भंडारा दि 28:- नागरिकांनी विधानसभा निवडणूकीमध्ये लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावावा. याकरीता आर.एम. पटेल महाविद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून वोट डालने को जाना हैा अपना फर्ज निभाना हैा, मतदान हमारा अधिकार हैा, वोट फॉर बेटर इंडिया असे संदेश साकारुन मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली.भंडारा विधानसभा क्षेत्रांतर्गत शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत व विविध ठिकाणी स्विप कार्यक्रमांतर्गत मतदानासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. 26 सप्टेंबरला भंडारा येथील आर.एम. पटेल महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग व गृह अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. रंजना श्रृंगारपवार यांच्या मार्गदर्शनात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात महाविद्यालयाच्या 20 विद्यार्थीनींनीचा सहभाग  होता. यामध्ये विधानसभा निवडणूकीमध्ये प्रत्येक नागरिकांनी आपल्याला मिळालेले अधिकार मतदानाच्या रुपाने बजावावा व लोकशाहीला बळकट करावे, मतदानापासून नागरिकांनी वंचित राहू नये या करीता रांगोळी स्पर्धेचा माध्यमातून मतदारांना आवाहन करणारे संदेश देण्यात आले. यामध्ये वोट डालने को जाना हैा अपना फर्ज निभाना हैा, मतदान हमारा अधिकार हैा, गीव्ह वोट,  प्राऊड टू बी व्होटर, माय व्होट माय राईट, वोट फॉर बेटर इंडिया यासह मतदारांना आवाहन करणारे विविध संदेश रांगोळीतून साकारण्यात आले.

महाविद्यालयात घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून मतदारांना त्यांच्या हक्काची जाणीव करुन देण्यात आली. लोकशाही मतदान प्रक्रियेने बळकट करता येते, असे आवाहन करण्यात आले. मतदान आपल्याला मिळालेले अधिकार आहे आणि तो आपण अवश्य बजावावा यासह विविध संदेशांनी आवाहन करण्यात आले. रांगोळीच्या माध्यमातून मतदारांकरीता साकारण्यात आलेले संदेश हे नागरिकांना आकर्षित करणारे ठरले. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून मतदानाची जनजागृती प्रभावशिल ठरली आहे.

आर.एम. पटेल महाविद्यालयासोबतच भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्रातील शाळा, महाविद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सहाय्याने नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या विधानसभा क्षेत्रामध्ये स्विप कार्यक्रमातून मतदानाची  व्यापक जनजागृती होऊन मतदानाची आकडेवारी वाढावी, एकही मतदार  मतदानापासून वंचित राहू नये या करीता उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय पोयाम व स्विपचे नोडल अधिकारी अनिता झाडे यांनी आवाहन केले आहे.