30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ निवडणूक खर्च संनियंत्रणासाठी नियुक्त सर्व पथकांनी दक्ष रहावे-  नरेंदर सिंग

निवडणूक खर्च संनियंत्रणासाठी नियुक्त सर्व पथकांनी दक्ष रहावे-  नरेंदर सिंग

0
23

वाशिम, दि. २9 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांकडून मतदारांना मद्य, पैसे अथवा इतर वस्तूचे प्रलोभन देवून त्यांच्यावर प्रभाव टाकला जावू नये, यासाठी निवडणूक खर्च संनियंत्रणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व पथकांनी दक्ष रहावे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शी व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना निवडणूक खर्च निरीक्षक नरेंदर सिंग यांनी दिल्या. नियोजन भवन येथे निवडणूक खर्च संनियंत्रण समिती सदस्य व विविध पथकांचे प्रमुख यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक अतुल कानडे, जिल्हा कोषागार अधिकारी तथा निवडणूक खर्च संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी चंद्रकांत खारोडे, सहाय्यक खर्च निरीक्षक युसुफ शेख, एम. व्ही. तायडे, एन. जी . मसरे, श्री. सिंग यांचे संपर्क अधिकारी संतोष कंदेवार यांच्यासह स्थिर सर्वेक्षण पथके, फिरती पथके, व्हिडीओ संनियंत्रण पथक, लेखांकन पथकाचे प्रमुख उपस्थित होते.

श्री. सिंग यावेळी म्हणाले, निवडणूक खर्च संनियंत्रणासाठी नियुक्त सर्व पथकांनी दक्ष राहून काम करावे. आपल्या मतदारसंघाच्या क्षेत्रात मतदारांना पैसे, मद्य किंवा इतर कोणत्याही वस्तूंचे वाटप होत असल्याची माहिती अथवा तक्रार प्राप्त झाल्यास फिरत्या पथकांनी त्वरित त्याठिकाणी पोहचून कार्यवाही करावी. जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर नेमण्यात कार्यान्वित करण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकांनी जिल्ह्यात येणाऱ्या व जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या वाहनांची काळजीपूर्वक तपासणी करून त्यामधून पैसे, अवैध मद्य अथवा शस्त्रांची वाहतूक होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तसेच निवडणूक खर्च संनियंत्रणविषयी कोणत्याही अडचणी अथवा शंका असल्यास संपर्क साधावा. निवडणूक आयोगाने विहित केलेले विविध अहवाल सर्व पथक प्रमुख व निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षाने नियमितपणे पाठवावेत, असे अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.