27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ आलेसुर येथे जागतिक वृक्ष दिवस साजरा

आलेसुर येथे जागतिक वृक्ष दिवस साजरा

0
43

भंडारा,दि.29ः-जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा आलेसुर(लेंडेझरी)येथे 27 सप्टेंबरला जागतिक वृक्ष दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.आय.यु.सी.एन. प्रकल्प अंतर्गत भारतीय वन्यजीव न्यास,वनविभाग आणि शाळेच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकरिता चित्रकला व निंबध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धे मध्ये ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. चित्रकला साठी ‘वन व वन्यजी ‘ हा विषय देण्यात आला होता.प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात आली. याव्यतिरिक्त शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमात शाळेचे विद्यार्थी,शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्राम वन हक्क समितीचे सदस्य तसेच चंद्रकांता भंडगे(वनपरीक्षेत्र अधिकारी, लेंडेझरी), श्री चव्हाण(वनपरीक्षेत्र अधिकारी, मुल्ला), श्री गायकवाड(क्षेत्र अधिकारी, चिखली) श्री निखाडे(वनरक्षक, आलेसुर), अरुण गनवीर(मुख्याध्यापक) व भारतीय वन्यजीव न्यास चे विभोर चौधरी, हिवराज राऊत, नितिन रावते व अमजद पठाण उपस्थित होते.