30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ दुसऱ्या दिवशी 96 उमेदवारांनी केली 237 नामनिर्देशनपत्राची उचल

दुसऱ्या दिवशी 96 उमेदवारांनी केली 237 नामनिर्देशनपत्राची उचल

0
19

Ø  साकोली विधानसभा क्षेत्रासाठी एक नामांकन दाखल

Ø  144 उमेदवारांनी केली 353 नामनिर्देशनपत्राची उचल

 

भंडारा,दि.01 : विधानसभा निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द होताच    तुमसर, भंडारा, साकोली, विधानसभा क्षेत्रात नामनिर्देशनपत्र उचल करणे व उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून आज सोमवारी  तुमसर 22 उमेदवार 56   नामनिर्देशनपत्र, भंडारा 42 उमेदवार 109 नामनिर्देशनपत्र तर साकोली 32 उमेदवार  72 नामनिर्देशनपत्राची उचल केली आहे. तीनही क्षेत्रात आज 96 उमेदवारांनी 237 नामनिर्देशनपत्राची उचल केली असून  आतापर्यंत एकूण 144 उमेदवारांनी 353 नामनिर्देशनपत्राची उचल केली आहे. तर साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये अपक्ष म्हणून अतुल नारायण परशुरामकर या उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.

60-तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये 22 उमेदवारांना 56 नामनिर्देशनपत्र उचल करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी येथे 12 उमेदवारांनी 42 नामनिर्देशनपत्राची उचल केलेली आहे. या क्षेत्रात आतापर्यंत एकूण 34 उमेदवारांनी 98 नामनिर्देशनपत्राची उचल केली आहे. यामध्ये राजकीय पक्ष व अपक्षांचा समावेश असून सध्या येथे एकाही उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही.

61-भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये 42 उमेदवारांकरीता 109 नामनिर्देशनपत्र स्विकारलेली आहे. पहिल्या दिवशी येथे 26 उमेदवारांनी 60 नामनिर्देशनपत्राची उचल केली आहे. आतापर्यंत येथे 68 उमेदवारांनी 169 नामनिर्देश्नपत्राची उचल केली आहे. परंतु एकाही उमेदवारांचा अर्ज दाखल झालेला नाही. उचल करण्यात आलेले नामनिर्देशनपत्र्य  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी, विदर्भ राज्य आघाडी, शेतकरी संघटना, भारतीय कॅम्युनिष्ठ पार्टी, बहुजन समाज पार्टी, पिपल्स रिपब्लीकन पार्टी व अपक्षांनी उचल केलेली आहे.

62-साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये 32 उमेदवारांकरीता 72 नामनिर्देशनपत्राची उचल करण्यात आली असुन पहिल्या दिवशी 10 उमेदवारांनी 14 नामनिर्देशनपत्राची उचल केलेली आहे. आता पर्यंत 42 उमेदवारांनी 86 नामनिर्देशनपत्राची उचल केलेली असून अतुल नारायण परशुरामकर या उमेदवाराने अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. उर्वरित तुमसर व भंडारा विधानसभा क्षेत्रात अद्यापपर्यंत एकाही उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही.

तीनही क्षेत्रामध्ये पहिल्या दिवशी 48 उमेदवारांनी 166 नामनिर्देशनपत्र तर आज दुसऱ्या दिवशी 96 उमेदवारांनी 237 असे  एकूण 144 उमेदवारांनी 353 नामनिर्देशनपत्राची उचल केली आहे. नामनिदे्रशन पत्र उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भंडारा, तुमसर व साकोली यांच्या सतरावरुन दुपारी 3 वाजेपर्यंत वितरित करण्यात येत आहेत. 27 सप्टेंबर पासून तर 4 ऑक्टोंबर पर्यंत नामनिर्देशनपत्र स्विकारणे व दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.