27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ लाखनी येथे रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबीर

लाखनी येथे रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबीर

0
45

लाखनी:३

श्रुष्टी नेचर क्लब द्वारा आयोजित लॉयन्स क्लब, सार्वजनिक दसरा महोत्सव आणि

ग्रामीण रुग्णालय लाखणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज लाखनी येथील डॉ हेडगेवार रक्तपेढी नागपूर द्वारे आज दि 3 ऑक्टोबर रोज गुरुवारला क्रीडा संकुल समर्थ नगर येथे रक्त दान आणि संपूर्ण आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचा ५०० नागरिकांनी लाभ घेतला असून 51 युवकांनी रक्त दान केले. दरवर्षी दसऱ्याचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजिन करण्यात येते. लाखनी ग्रामीण रुग्णालयातील सीमा बावनकर, रूपाली वाघमारे, प्रतिमा सोनेवाने यांनी आरोग्य तपासणी करण्यासाठी परिश्रम घेतले असून दसरा समिती अध्यक्ष संदीप भिवगडे, दीपक देशमुख, मयूर भांडारकर, पितांबर क्षीरसागर, अर्पित गुप्ता, प्रशांत खेडीकर, दत्ता गिर्हेपुंजे, विजय गुरुणानी,अजिंक्य भांडारकर, भोला सचदेव, अंजली खेडीकर, सविता फेंडरकर, शिल्पी गुप्ता यांनी संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.